पत्नी सांगायची धुणे भांडी -पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पतीची गळफास घेऊन आत्महत्या
पत्नीच्या छळास कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या दोघांवर गुन्हा दाखल

-पत्नी सांगायची धुणे भांडी व स्वयंपाक करायला
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 19 – पत्नी धुणीभांडी व घरकाम करण्यास सांगत असल्याने आणि ते न केल्यास तुरंगात टाकण्याची धमकी देत असल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना येरवडा येथील प्रीझम कॉलनीमध्ये शुक्रवार दुपारी घडली. याप्रकरणी पत्नी व सासरच्या दोघांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण रखमाजी अवसरे (वय-35, रा. प्रिझम कॉलनी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण अवसरे (वय-28, रा. चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे.
श्रीकृष्ण यांच्या पत्नीला घरकाम तसेच स्वयंपाक करता येत नव्हता. यामुळे विवाह झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांतच तिने पतीचा छळ करण्यास सुरुवात केली. ती पतीला घरातील सर्व कामे सांगायची. ती सांगेल तसेच वागायचे आणि तसेच करायचे, असा दबाव त्यांच्यावर टाकत होती. घरातील इतर काम करण्यास लावण्याबरोबर धुणीभांडी व स्वयंपाकही करायला सांगत होती. काम न केल्यास ती माहेरी आई-वडील व भावाला फोन करून त्यांच्याबद्दल तक्रार करायची. हा त्रास सन 2012 पासून सुरू होता. अनेकदा श्रीकृष्ण यांच्या पत्नीचे आई-वडील फोन करून किंवा प्रत्यक्षात घरी येऊन ती सांगेल तसेच काम करायचे, असा दम देत होते. वारंवार अपमान करून व मानसिक त्रास देऊन खोट्या तक्रारी करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती. या सर्व छळाला कंटाळून श्रीकृष्ण यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)