पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

तळेगाव-दाभाडे – बायको व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून स्वप्निल बबन धामणकर (वय 40 रा. आनंदनगर, तळेगाव-दाभाडे, ता. मावळ) यांनी राहत्या घरी विषारी औषध पिऊन रविवारी सायंकाळी आपले जीवन संपवले.

या प्रकरणी कांचन स्वप्निल धामणकर (पत्नी), नीलिमा हिरामण फेंगसे (सासू), धनंजय उर्फ गण्या हिरामण फेंगसे (मेहुणा), दुसरा मेहुणा गोट्या (सर्व रा. ताथवडे, ता. हवेली) यांच्या विरूद्ध तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मयत स्वप्नील धामणकर यांच्यावर शिवाजीनगर (पुणे) न्यायालयात पोटगी व कौटुंबिक हिंसाचाराचा दावा सुरू असून स्वप्निल याला त्यांची बायको कांचन, सासू नीलिमा दोन मेहुणे धनंजय उर्फ गण्या व गोट्या वारंवार मानसिक छळ करत होते. आत्महत्येपूर्वी स्वप्निल यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बायको व सासरच्या मंडळींची नावे आहेत.

स्वप्निल यांचा भाऊ मंगेश बबन धामणकर यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार बायको आणि सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)