पत्नी व मुलीला भेटून परतताना रेल्वे अपघातात वडिलांचा मृत्यू

पिंपरी – पत्नी व मुलीला भेटून परतत असताना वडीलांचा पिंपरी रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.30) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. मयत व्यक्‍तीची गुरुवारी (दि.31) ओळख पटली आहे. संजय साहेबराव शिंदे (31) असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. पत्नी आणि मुलीला भेटून बहिणीच्या घरी निघालेल्या शिंदे (31) यांना रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्ट कट त्यांच्या जीवावर बेतला. संजय त्यांच्या कुटुंबाचा आधार होता. त्यांच्यामागे आई, वडील, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

संजय मोरवाडीतील लालटोपी नगर येथे पत्नी आणि मुलगी योगेश्‍वरीला भेटायला आले होते. त्यांचे आणि पत्नीचे पटत नसल्याने तो बहिणीकडे तर कधी मित्रांकडे गेल्या तीन महिन्यांपासून रहात होते. पत्नी आणि मुलगी योगेश्‍वरीला भेटल्यानंतर संजय काळेवाडी येथे रहाणाऱ्या बहिणीकडे जाणार होते. पिंपरी रेल्वेस्थानकाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना पुणे-मुंबई इन्टरसिटी एक्‍सप्रेसने संजयला जोरात धडक दिली. संजय जवळपास दहा फूटावर जाऊन पडले. ट्रेनच्या या धडकेत संजय यांचा जागीच मृत्यू झाला. संजय हे बिगारी काम करायचे, तर पत्नी भांडी धुण्याचं काम करून कुटुंब चालवत होती. त्यांची मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)