पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या

कोल्हापूर –  पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्येतून पतीने आत्महत्या केलीय. सतीश शंकर गोंधळे (वय ३७, रा. सुधाकर जोशीनगर) असे त्यांचे नाव आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह प्रियकरावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रिया सतीश गोंधळे (वय ३५), तिचा प्रियकर विनायक कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत.

प्रिया व विनायक यांच्या प्रेम संबंधामुळ सतीश गोंधळे यांना मानसिक त्रास होत होता. दोघेही पळून गेल्याने ते अपमानित झाले. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा भाऊ चिदानंद शंकर गोंधळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)