पत्नीस भेटू दिले नाही म्हणून आत्महत्या

घटनेचा व्हिडिओ नातेवाईकांना पाठविला व्हॉटस्‌ अॅपवर

पुणे – पत्नीस व मुलास मामे सासऱ्याने भेटून न दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हॉटस्‌ अॅपवर पत्नी व इतर नातेवाईकांस पाठवला होता.

-Ads-

सचिन दिनकर कुटे (30, वडगाव बु.) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी सिंहगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मामे सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कुटे याचे सलूनचे दुकान आहे. भांडणे झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. ती मामाकडे वास्तव्यास होती. सचिन हा पत्नी व मुलाला भेटण्यासाठी मामे सासऱ्याकडे गेला होता. मात्र, त्यांनी त्याला पत्नी व मुलास भेटू दिले नाही. भेटण्याचा प्रयत्न केल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याचा व मुलास ठार मारुन टाकण्याची धमकी दिली. यामुळे नैराश्‍यातून सचिनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने त्याचा व्हॉटस्‌ अॅपवर व्हिडिओ काढला होता. याप्रकरणी दि.15 ऑक्‍टोबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. पांडुळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)