पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणात पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याला 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.के.खराडे यांनी दिला आहे.
हे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशचे आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपासून लोहगाव भागात राहत आहे. पतीचे वय 38 आहे. तर फिर्यादी पत्नीचे वय 35 आहे. पतीला दारूचे व्यसन आहे. तो पत्नीसोबत पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. सततच्या या त्रासाला कंटाळून तिने विमानतळ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)