पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे- पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून, तिचे अश्‍लील चित्रण तयार करून, ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पतीच्या पोलीस कोठडीमध्ये 16 एप्रिल पर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला आहे.
या प्रकरणी 23 वर्षीय पतीसह दिर, सासरे, सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 23 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. एप्रिल 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांत सासरच्यांकडून पीडित विवाहीतेला मानसिक त्रास देण्यास सुरूवात झाली. तिच्याकडून पाच सोन्याचे नेकलेस, 16 सोन्याच्या अंगठ्या, 12 सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याचे ब्रेसलेट, एक सोनसाखली यांचा अपहार करण्यात आला. पतीने पीडित महिलेचे अश्‍लील चित्रीकरण करून याबाबत कोणाला सांगितल्यास ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या मर्जी विरुद्ध अनैसर्गिक कृत्य केले. पतीच्या कृत्याबाबत सासऱ्यांना सांगितले असता, त्यांनीही तिचा विनयभंग केला. पोलीस कोठडीची मुदत संपली असता पतीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यातील अपहार केलेला ऐवज जप्त करण्यासाठी, व्हिडीओ रेकॉर्डींगची साहित्य जप्त करण्यासाठी, हे रेकॉर्डींग कोणाला पाठवले आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पतीला पोलीस कोठडी वाढ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)