पत्नीवर रिल्व्हॉल्वरमधून गोळीबार

पुणे,दि.13-
दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर एकाने रिल्व्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची घटना ताडीवाला रस्ता भागात घडली.
या घटनेत कडूबाई बालाजी चाथे (42, रा. सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रस्ता) जखमी झाल्या आहेत. पत्नीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बालाजी चाथे (46 ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीला दारू पिण्याचे व्यसन आहे. बालाजी दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कडूबाई यांनी त्याला दारू पिऊ नका, असे बजावले. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. दारूच्या नशेत असलेल्या बालाजीने त्याच्याकडील रिल्व्हॉल्वरमधून कडूबाईवर गोळीबार केला. गोळी चाटून गेल्याने कडूबाई किरकोळ जखमी झाल्या. गोळीबार केल्यानंतर बालाजी तेथून पसार झाला.
या घटनेची माहिती बालाजी मुलगा योगेश (23) याने पोलिसांना दिली. परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नीवर गोळीबार करणाऱ्या बालाजीची पाश्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याचा मुलगा योगेश याने दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक एन.जे. घाग तपास करत आहेत
चौकट :
आरोपी बालाजी चाथे हा बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्समधून निवृत्त झाला आहे. निवृत्तीनंतर सिक्‍युरिट गार्ड किंवा बॉडिगार्डचे काम करण्यासाठी त्याने शस्त्र परवाना काढून शस्त्र घेतले होते. या घटनेत त्याची पत्नी थोडक्‍यात बचावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)