पत्नीला जेवण चांगले करण्यास सांगणे हा छळ नव्हे

उच्च न्यायालयाचा निर्वाळा : पतीसह त्याच्या आई-वडीलांची निर्दोष मुक्तता
मुंबई – पत्नीला नवऱ्याने अथवा कुटूंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीने घरातील कामाबरोबरच जेवण चांगले करण्याचा सल्ला देणे म्हणजे छळ नव्हे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. सांगली येथील 17 वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्याप्रकरणी दाखल झालेल्या अपीलावर न्यायमूर्ती सारंग कोटवाला यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना पती आणि त्याच्या आई-वडीलांची निर्दोष मुक्तता केली.

सांगली येथील विजय शिंदे याचा या प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या महिलेशी 1998 मध्ये विवाह झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्या महिलेने जून 2001 मध्ये विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सांगली न्यायालयात विजय शिंदे आणि त्याच्या आई-वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशय आणि घरकाम आणि चांगले जेवण करण्याचा सासरच्या मंडळींकडून तगादा लावला जात होता. त्यातुन भांडण होऊन तिने विष घेतले, असा दावा करण्यात आला होता.

-Ads-

सत्र न्यायालयाने हा दावा फेटाळून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्या विरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपीलावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. कुटुंबाकडून वारंवार जेवण चांगले करण्याचा तगादा लावला जात असल्याने या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीकडून केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.

घरातील सुनेला जेवण व्यवस्थित बनवायला सांगणे अथवा तिला घरकाम करायला सांगणे म्हणजे वाईट वागणूक दिली, असा होत नाही. सूनेला त्रास दिल्याचा किंवा तिला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच नवऱ्याचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप सिद्ध होऊ शकेल, असा कोणताही पुरावा फिर्यादी पक्षाला सादर करता आलेला नाही, असे स्पष्ट करून स्पष्ट न्यायालयाने आरोपींना निर्देष सोडण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)