पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी – दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मोशी येथे घडली.

सुभाष दिनकर पांचाळ (वय-30, रा. तुकाराम बनकर चाळ, टायगर गुहा, मोशी. मुळगाव बामणी मंडळ, तानूर, जि. निजामाबाद, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या मुलीसह घरात होत्या. त्यावेळी त्यांनी आपले पती आरोपी सुभाष याला कामावर जा, दारू पिऊ नकोस, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या सुभाष याने पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक निरीक्षक विठ्ठल साळुंके तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)