पत्नीपीडित पतींसाठी पुरूष आयोग स्थापन करा

भाजप खासदाराच्या मागणीने लोकसभेत हशा
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार हरीनारायण राजभर यांनी पत्नीपीडित पतींच्या समस्या निवारणासाठी पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी लोकसभेत केली. त्यांनी ही मागणी कळकळीने आणि गंभीरपणे मांडली खरी; पण त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

लोकसभेत शून्य प्रहरावेळी राजभर यांनी पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी केली. अनेक पुरूषांना त्यांच्या पत्नींकडून होणाऱ्या यातनांना सामोरे जावे लागते. पण, त्यांच्या समस्या सोडवणारी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. महिला आयोगासारख्या अनेक आयोगांची स्थापना झाली.

आता केंद्र सरकारने पुरूष आयोगही स्थापन करावा, असे ते म्हणाले. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. एवढेच नव्हे तर, बहुतांश खासदारांची एकमेकांशी कुजबूजही सुरू झाली. राजभर यांनी केलेल्या मागणीवेळी सभागृहात पाच महिला खासदार उपस्थित होत्या. त्याही त्यांचे हसू रोखू शकल्या नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)