पत्नीने पती हरविल्याची तक्रार दाखल केली तब्बल सोळा वर्षानंतर

पत्नीने पती हरविल्याची तक्रार दाखल केली तब्बल सोळा वर्षानंतर
पुणे,दि.20(प्रतिनिधी)- पती 2001 साली बेपत्ता झाल्यानंतर त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने 10 जून 2017 मध्ये दिली. पोलिसांत तक्रार कशी द्यायची हे माहित नसल्याने तसेच मुले लहान असल्याने तिने आजवर तक्रार दाखल केली नव्हती . मात्र मुलांची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नोकरीसाठी वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला गरजेचा असल्याने तब्बल सोळा वर्षानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
झुंबर दशरथ कोळी(35,रा.वडगावशेरी) हे सन 2001 साली घरी कोणासही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांची पत्नी छाया झुंबर कोळी(45) या त्यावेळी वडगाव शेरीतील एक शाळा व हॉस्पिटलमध्ये कामाला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी नातेवाईक व मित्र परिवाराकडे पतीची अनेकदा चौकशी केली होती. मात्र मुले लहान असल्याने व पोलिसांत तक्रार द्यायची माहिती नसल्याने त्यांनी आजवर पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली नव्हती. दरम्यान त्यांना मुलांचे उच्च शिक्षण व नोकरीसाठी पतीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची गरज होती. यासाठी त्या पती शिकत असलेल्या गावाकडील शाळेत दाखला आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना शाळेने पती हरविल्याची पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्याने त्यांनी 10 जून 2017 रोजी चंदननगर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या पतीचे दुसरीपर्यंत शिक्षण झालेले असून त्याला दारुचे व्यसन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)