पत्नीच्या आत्याचा खून करणाऱ्याचा जामीन फेटाळला

सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांचा आदेश


पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने केले हे कृत्य

पुणे- पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचे कारणावरून मेहुण्याला मारहाण करत त्याच्या अत्याचा खून केल्याप्रकरणात मुख्य आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.
कोंडीबा ऊर्फ कोंडीभाऊ भिवा बरकडे (वय 30, रा. पळशी, ता. पारनेर,जि. अहमदनगर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. कोंडीबा आणि अशोक देवराम बरकडे आणि दादाभाऊ ठका बाचकर (वय 36, रा. पळशी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) या तिघांना या प्रकरणात रांगणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भानुबाई भाऊ बरकडे (वय 62, रा. पळशी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्यांचे नाव आहे. त्यांचा भाऊ साहेबराव साळा थोरात (वय 46, रा. गावडे वस्ती, वाघाळे, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना फिर्यादींच्या घरासमोरील अंगणात 20 फेब्रुवारी 2017 रोजी घडली. कोंडीबा हा फिर्यादींचा जावई आहे.

फिर्यादी मुलगी बाळाबाई यांना नांदवण्यात पाठवत नाहीत, या कारणावरून तिघांनी फिर्यादींचा मुलगा साहेबराव यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादींची बहिण भानुबाई वाद मिटविण्यास गेल्या. त्यावेळी दगड फेकून मारून भानुबाई यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन्हीही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर कोंडीबा याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. कोंडीबा व्यसनी आहे. त्याच्यापासून फिर्यादींची मुलगी बाळाबाई यांच्या जिविताला धोका आहे. तो मेंढपाळ आहे. गावोगावी फिरत असतो. जामीन मिळाल्यास तो न्यायालयात सुनावणीला हजर राहण्याची शक्‍यता कमी आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने कोंडीबा याचा जामीन फेटाळला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)