पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

डिकसळ- पत्नीला आपल्या घरी चलं, असे म्हणूनही पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि. 22) दुपारी भिगवण मधील वॉर्ड क्र 4 मध्ये घडली.
भिगवण पोलिसांनी आरोपी अमीर यासीन मुलाणी (रा. भिगवण वार्ड नं. 4) याला अटक केली आहे. याबाबतची फिर्याद फरीदा अमीर मुलाणी (वय 21 रा. भिगवन वॉर्ड नं. 4) यांनी दिली आहे. पोलीसांनी सांगितले की, पती अमीर मुलानी याने पत्नी फरीदा हिस तु आताच माझ्या बरोबर आपल्या घरी चलं, असे म्हणाला; यावर फरीदा हिने आपण थोड्या वेळाने जाऊ, असे म्हणाली असता आरोपी आमीर मुलाणी याने तीला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करून जिवे मारण्याचे उद्देशाने घरातील रॉकेलने भरलेल्या कॅनमधील रॉकेल फिर्यादीच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)