पत्नीची हत्या करुन पती फरार

नागपूर – पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल परिसरात ही घटना घडली. ममता एकनाथ कोहळे असे मृत महिलेचे नाव आहे, तर आरोपी पती सध्या फरार आहे.

महिलेचा पती एकनाथला दारूचे व्यसन होते. त्याचे पत्नी ममताशी नेहमी खटके उडत. एकनाथ आणि ममताचा प्रेमविवाह असून त्यांना दोन मुले आहेत. एकनाथ ममताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत असत. रोजच्या भांडणामुळे काही दिवसांपूर्वी ममता दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली. एकनाथ तिच्या माहेरी गेला आणि तिला परत घरी घेऊन आला. मात्र त्यांच्यातील वाद काही केल्या संपत नव्हता.

या नेहमीच्या वादामुळे एकनाथने ममताला लाकडी दांड्याने डोक्‍यावर मारले. यात ती गंभीर जखमी झाली. त्यांच्या शेजाऱ्यांना भांडणाचा आरडाओरडा ऐकू आला. यानंतर शेजाऱ्यांनी ममताला मेयो रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात कळमना पोलिसांनी एकनाथवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)