पत्नीचा छळ करणाऱ्या पती, त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांचा आदेश

पुणे – पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पती, त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.
याबाबत 28 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती, पतीच्या 35 वर्षीय नातेवाईक या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत लोहगाव येथील एका सोसायटीमध्ये घडली. फिर्यादींनी तिच्या पतीविरोधात बलात्कराची तक्रार दिली होती. त्यामुळे बदनामी झाल्याने पतीने तिच्याकडे घटस्फोट देण्याची मागणी केली.

-Ads-

मात्र, फिर्यादीने घटस्फोटास नकार दिला. त्यामुळे पतीने फिर्यादींचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तर पतीचा 35 वर्षीय नातेवाईकाने फिर्यादी एकट्या असताना घरात घुसला. विनयभंग, अश्‍लील चाळे करत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पती, त्याच्या नातेवाईकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. या गुन्ह्यात पती, त्याच्या नातेवाईकाची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी दोघांना अटक करणे गरजेचे आहे. दोघांनी तक्रार मागे घेण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात फिर्यादींना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. दोघे मूळचे झारखंड येथील रहिवाशी आहेत. अटकपूर्व जामीन मंजुर झाल्यास दोघे फरार होण्याची अथवा तपासामध्ये अडथळा आणण्याची शक्‍यता आहे, यासाठी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)