पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विनयभंग

पिंपरी – दुचाकीस्वाराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेशी लगट करीत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी ( दि. 9 ) सकाळी नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात घडली.

या प्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या विकृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अनोळखी तरुणाने त्यांना “रोझ सोसायटी कहा है’ असे विचारले त्यावर त्यांनी “मुझे मालूम नही’ असे उत्तर दिले.

त्यानंतर फिर्यादी तेथून काही अंतर चालत गेल्यानंतर आरोपीने पुन्हा येऊन त्यांच्याशी शाररिक लगट करण्याचा प्रयत्न केला. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक निकुंभ करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)