पती सोबत राहत नसल्याने मंत्रालयाबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – लग्न झाल्यानंतरही पती सोबत राहत नाही. तक्रार करूनही पोलीस दाद देत नाहीत. यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कंटाळलेल्या एका महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला अंगावर रॉकेल ओतून घेत असतानाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

जिल्हा व तालुका पातळीवर सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याने आता ग्रामीण भागातील आत्महत्यांचे लोण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले आहे. चेंबूर परिसरातील समता नगर येथे दिपाली खंडू भोसले या राहतात. त्यांचे लग्न होवूनही मागील सात वर्षापासून त्यांचे पती त्यांच्या सोबत न राहता अन्य एका महिलेसोबत राहात आहेत. तसेच दिपाली यांना सय्यद मोहम्मद अन्सारी हा मुस्लिम व्यक्ती सतत त्रास देतो. याविरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. त्याविरोधात मंत्रालयातील गृह विभागात दाद मागितली. मात्र तरीही न्याय मिळत नसल्याने ही महिला आज पुन्हा मंत्रालयात आली. मात्र तिला मंत्रालयात न सोडल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या दिपाली यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु अचानक घेरी येवून खाली कोसळल्याने तिला पोलिसांनी तातडीने जी.टी.हॉस्पीटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)