पती-मुलासह सुप्रिया सुळेंनी घेतले अंबाबाईचे दर्शन 

कोल्हापूर – अंबाबाई दर्शनाला येणारा पर्यटक मंदिराच्या प्रेमात नाही पडला, तरच नवल. शिल्पसौंदर्यांने नटलेल्या मंदिर आवारात अनेकजण फोटोसेशन करतात. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज हजारो पर्यटक दर्शनासाठी येतात आणि मराठमोळ्या दागिन्यांच्या प्रेमात पडतात.

आज खासदार सुप्रिया सुळेंनाही मोह आवरता आला नाही. त्यांनी पती व मुलासोबत अंबाबाईचे दर्शन घेतले आणि मंदिर आवारातील दुकानात हातभर हिरव्या बांगड्या भरल्या, नाकामध्ये नथ घालून चक्क मंदिरात फोटोसेशनच केले.

कोल्हापूर भेटीला आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे नेहमीच अंबाबाई दर्शनाला येतात. अनेकदा मंदिराच्या आवारात क्षणभरही न थांबता घाईत निघून जातात. पण आज मात्र त्यांनी मंदिर आवारात जणू क्षणभर विश्रांतीच घेतली. गतवेळी मंदिराला केलेल्या विद्यूत रोषणाईसोबत सेल्फी घेऊन लगेचच परतलेल्या सुप्रियाताईंनी आज चक्क मराठमोळा लूक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पोझही दिल्या. पती आणि मुलासोबतही अनेक फोटो त्यांनी क्‍लिक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)