पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

चिखली – नवीन फ्लॅट घेण्यासाठी वीस टक्‍क्‍यांहून अधिक आगाऊ रक्कम भरली. परंतु ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट नावावर करून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बांधकाम व्यावसायिकाने विनयभंग केला. तसेच पतीला मारहाण केली. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, निर्मलकुमार मगनभाई पटेल, मितेशकुमार पोकर, अंकीत प्रवीणभाई पटेल, हिरेन प्रवीणभाई पटेल, सतीशकुमार रावजीभाई पटेल आणि चिरायु चिमणभाई पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णु विहार गृहप्रकल्पामध्ये फिर्यादी यांनी टू बीएचके फ्लॅट बुक केला. त्यावेळी फिर्यादी यांनी बांधकाम व्यावसायिकाला रोख रक्कम आणि धनादेश असे एकूण 16 लाख रुपये आगाऊ दिले. ही रक्कम फ्लॅटच्या किमतीच्या 20 टक्‍क्‍यांहून अधिक असून बांधकाम व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. तसेच फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यामध्ये नऊ लाख रुपये परस्पर जमा केले.

याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला पतीसह बांधकाम व्यावसायिकाच्या चिखली येथील कार्यालयात गेल्या. यावेळी चिरायू पटेल याने फिर्यादीसोबत अश्‍लील वर्तन केले. तसेच बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील इतरांनी मिळून फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. तसेच अश्‍लील भाषा वापरत धमकी देखील दिली. निगडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)