पतीनेच काढला पत्नीचा काटा

यवत- दौंड तालुक्‍यातील बोरीपारधी, चौफुला गावच्या हद्दीत असलेल्या चोरमलेवस्ती येथील जमीन गट क्रमांक 151 मधील विहिरीत पाण्यावर तरंगताना एका अनोळखी तरुणीचा मृतदेह मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास आढळून आला होता. या मृतदेहाचे 24 तासांत गुढ उकलले असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीच्या पाठीत चाकून मारून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे उघड झाले असून पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
सोनी राजकुमार कुसवाह (वय 19) असे खून झाल्या तरुणीचे नाव असून राजकुमार रामसिंग कुसवाह (रा. बोरीपारधी, ता. दौंड मूळ रा. सुखलालछापर, जि. गोपालगंज, बिहार) यास नाशिक येथून चोवीस तासांच्या आत ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार व मृत सोनी यांचे लग्न गेल्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते. राजकुमार हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे मंगळवारी (दि. 9) राजकुमारने पत्नीस चाकूने पाठीत मारीत त्यानंतर गळा आवळून खून केल्यानंतर तो खून लपविण्यासाठी विहिरीत टाकून दिला. त्यानंतर आरोपी राजकुमार हा फरारी झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता राजकुमार फरारी झाल्याने त्याच्यावर अधिक संशय बळावला. पोलिसांकडे कोणतेही धागेदोरे नसताना व्यावसायिक व तांत्रिक दृष्टीने तपास करून मृत तरुणीबाबत संपूर्ण माहिती काढून 24 तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. सायबर सेल पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांची तांत्रिक बाबींसाठी मोलाची मदत मिळाली. यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक गणेश पोटे, दीपक पालके, अभीजित कांबळे, महेश बनकर, गणेश झरेकर, विनोद रासकर, विशाल गजरे, संपत खबाले, नारायण सोमवंशी यांच्या पथकाने आरोपीस जेरबंद करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)