पतीचे नपुंसकत्व केवळ पत्नीच सांगू शकते; भाजप आमदाराची जीभ घसरली

भोपाळ : पुरुषांच्या नपुंसकत्वावरून कॉंग्रेस आमदाराची जीभ चांगलीच घसरली आहे कारण, मध्य प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री रुस्तम सिंह यांनी आपला पती नपुंसक आहे किंवा त्याच्यातील लैंगिक क्षमता कमी झाल्याचे केवळ पत्नीच सांगू शकते, असे संतापजनक आणि अजब विधान करून एकच खळबळ उडवून दिली.

पुरुषांमधील शुक्राणूंचे कमी झालेले प्रमाण आणि लैंगिक क्षमता किंवा नपुंसकत्व या समस्येसंबंधी काँग्रेस आमदारानं विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिंह यांनी हे विधान केले आहे. नपुंसकत्व रोखण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही असेही मंत्री रुस्तम सिंह यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात शुक्राणूंची कमी होणारी संख्या त्यामुळे येणारे नपुंसकत्व यावर उपाय म्हणून एखादी योजना तयार केली आहे का? असा प्रश्न आमदार सुंदरलाल तिवारी यांनी उपस्थित केला होता. नपुंसक रुग्णांची सत्यता पडताळणे, त्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही असाही प्रश्न तिवारी यांनी विचारला होता.

पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असल्याने वाढीस लागलेल्या नपुंसकत्वावर मात करण्यासाठी कोणतीही उपाययोजना कलेली नाही पण महिलांच्या आरोग्य शिबिरांतून दांपत्य नसलेल्या जोडप्यांचा शोध घेतला जातो. रीवातून १२६ नपुंसक व्यक्तींची निवड करण्यात आलेली असून राज्य आरोग्य निधीतून बीपीएल धारक कुटुंबासाठी नपुंसकत्वावर उपचार करण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)