पतसंस्थेची रोकड व कलेक्‍शन मशिन चोरले

पुणे – पतसंस्थेची डेली कलेक्‍शनची जमा झालेली रक्कम व कलेक्‍शन मशीन शिवाजी रोड येथून चोरण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जगन्नाथ कासार (48,रा.खराडी) हे धनलक्ष्मी नागरी पतसंस्थेत डेली कलेक्‍शनचे काम करतात. त्यांनी ग्राहकांकडून जमा केलेले 60 हजार, मोबाईल, कागदपत्रे व डेली कलेक्‍शनचे मशीन असा 62 हजार 600 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरटयाने चोरुन नेली. चोरी झाली तेव्हा फिर्यादी कसबा पेठेतील श्रीपाद ईडली सेंटर येथे होते. याप्रकरणी पोलीस नाईक विनायक शितोळे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)