पतसंस्थांकडील 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण

सहकारमंत्री सुभाष देशमुख : नोडल एजन्सी म्हणून एमसीडीसी काम करेल
कोल्हापूर – राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमसीडीसी काम करेल, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केला.

कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक लेखा परीक्षण तुषार काकडे आदीजण उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र समृध्द करण्याची ताकद सहकारात असल्याचे स्पष्ट करून सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या विशेषत: पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी सहकारात शिस्त आणि पारदर्शकता जोपासून सभासद हितास प्राधान्य देणे गरजेचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार पतसंस्थांची संख्या वाढविणे आवश्‍यक असून अडचणीतील पतसंस्थांना एमसीडीसीच्या माध्यमातून सहाय्य करून त्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी शासन पुढाकार घेईल. पतसंस्थांच्या 1 लाखांच्या ठेवींना संरक्षण देताना एमसीडीसीसाठी पतसंस्थांच्या अ, ब, क, ड या वर्गवारीनुसार प्रिमियम देणे गरजेचे आहे. पतसंस्थांकडील कर्ज आणि व्याज याबाबतही सर्वानी योग्य आणि सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

पतसंस्थांनी बॅंकींग क्षेत्राबरोबरच सहकारी रूग्णालयासारखे अन्य व्यवसाय-उद्योग विकसित करून उत्पन्नाची विविधांगी साधने निर्माण करणे काळाची गरज असल्याचे सांगून सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांनी विशेषत: पतसंस्थांनी एमसीडीसीसाठी भागभांडवलापोटी आपला प्रिमीयम स्वेच्छेने जमा करावा. राज्यातील पतसंस्थांसाठी एमसीडीसीच्या रूपाने देशातील एक सर्वोत्कृष्ट मॉडेल विकसीत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पतसंस्थांची अनुदानातून नव्हे तर योगदानातून वाढ व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)