मुंबई: पतंजली आयुर्वेदच्या विक्रीला मागील 5 वर्षांत पहिल्यांदाच धक्का बसला आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि इतर कारणामुळे कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. केअर रेटिंग्जच्या अहवालाच्या मते, कंपनीचा ग्राहक वस्तू महसूल आर्थिक वर्षाअखेर मार्च 2018 मध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरणीसह 8148 कोटींवर पोहोचला होता.
अहवालात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदच्या विक्रीत घसरणीमागचे मुख्य कारण हे जीएसटीच्या अंमलबजावणीत आलेली अडचण आणि सदोष वितरण व्यवस्था आहे.
कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी कंपनीची उलाढाल येत्या 3 ते 5 वर्षांत 20 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पतंजलीचा महसूल 2016 मध्ये 10 हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे 2012 मध्ये हा 500 कोटी रुपयांहून कमी होता.
पतंजलीकडे स्वत:चे चिकित्सालय असल्यामुळे सुरुवातीला याची लोकप्रियता मोठ्या वेगाने वाढली होती. परंतु, पतंजलीची उत्पादने किराणा दुकानात उपलब्ध होऊ लागल्याने कंपनीच्या चिकित्सालयांवर प्रभाव पडू लागला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा