पतंग उडविताना विद्यार्थ्याचा मृत्यू

कोंढव्यातील घटना : चौथ्या मजल्यावरून गेला तोल

पुणे/ कोंढवा – इमारतीच्या छतावरून पतंग उडवताना आठ वर्षीय मुलाचा तोल जाऊन मृत्यू झाला. ही घटना कोंढवा येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास व्हीआयटीआय कॉलेजच्या पाठीमागील परिसरात घडली. आतिक चांद शेख असे मुलाचे नाव आहे.

याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआयटीआय कॉलेजच्या पाठीमागील गेटसमोर एक चार मजली अर्धवट बांधलेली इमारत आहे. मागील वर्षांपासून तिचे काम बंद आहे. सध्या गेल्या आठवड्यापासून पतंगोत्सवाचा हंगाम सुरू आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आतिक शेख, अरबाज सय्यद, मेहराज यांच्यासह तीन ते चार मुले या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पतंग उडविण्यासाठी गेले. पतंग उडवत असताना अचानक आतिक शेख हा इमारतीच्या कडेला गेला. यावेळी अतिक शेख याचा पाय घसरुन तो चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्यात अतिकचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून मुलांनी नातेवाईकांना सांगितले.

यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत अतिकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आतिक शेख हा कोंढव्यातील प्रतिभाताई पवार शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. त्याचे वडील चांद शेख आणि काका हे टेम्पोचालक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)