पणसुंबापेठ येथे 600 किलो गोमास पकडले

पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवनेरी- संशयास्पद फिरत असलेल्या चारचाकीला गस्ती दरम्यान थांबवण्याचा प्रयत्न करणारे जुन्नरचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना गुरुवारी (दि. 29) पहाटे पणसुंबापेठ (ता. जुन्नर) येथे घडली. यावेळी वाहनचालकाने पोलीस वाहनालाही धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्यात सहाशे किलो गोमांस आढळले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
पणसुंबापेठ (ता. जुन्नर) येथे एक चारचाकी वाहन (एमएच 12 केएन 1587) संशयास्पदरीत्या फिरत असताना त्यास थांबण्याचा इशारा केला असता चालक शाहिद सलीम इनामदार (रा. मंगळवार पेठ, जुन्नर) याने गाडी वेगाने घेऊन रस्त्यात उभे असलेले पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, तसेच रस्त्यात उभी केलेल्या पोलीस गाडीला जोराने धडक दिली आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता नोमान कुरेशी, मजहर कुरेशी, अतिक बेपारी, नाजिम बेपारी, जीकरान कुरेशी, बाबा कुरेशी (सर्व रा. खलीलपुरा, जुन्नर) यांनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून ते गोमांस त्याच्याकडे दिले असल्याचे सांगितले.
याबाबतची फिर्याद पोलीस निरीक्षक नलावडे यांनी दिलेली असून, पोलिसांनी गोवंशहत्या, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल केलेला असून, आरोपी शाहिद इनामदार यास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)