पणत्यांसाठी मागवली बनारसवरून माती

आकर्षक पणत्यांची ग्राहकांना भुरळ

बुध, दि. 2 (प्रतिनिधी) – दिवाळीच्या सण चार दिवसांवर येवून ठेपल्यानंतर कुंभार आळीतील लगबग संपली असून विविध कलाकुसरीच्या पणत्या, दिवे, किल्ल्यांवरील सैनिकांच्या प्रतिकृती बाजारात दाखल झाले आहेत. कुंभार व्यवसायिकांनी पारंपरिकता जपण्याबरोबरच आधुनिकतेची जोड दिल्याने त्यांनी बनवलेल्या पणत्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या वस्तुंशी स्पर्धा करू लागल्या आहेत. काही कुंभारांनी खास बनारसवरून माती मागवून आकर्षक पणत्या बनवल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिपोत्सवानिमित्त प्रत्येक ठिकाणची कुंभार आळी दिवाळीच्या दोन महिने अगोदर प्रयत्नशील असते. ग्राहकांना नवनव्या उत्पादनाद्वारे आकर्षिंत करण्यासाठी पण त्या’ दिवे ,किल्ले यांचे नवनवे प्रकार सर्वत्र उपलब्ध आहेत. कुंभार समाजाबरोबरच गणपती आणि देवीच्या मूतींची उत्पादने अन्य समाजाचे कलाकारही करतात. त्यामुळे खूप मोठ्या स्पर्धला तोंड द्यावे लागते. परंतु आता दिवाळीच्या पणत्या ‘बोळकी, दिवे ‘ आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किल्ल्याचे उत्पादन कुंभार ओळीतच केले जाते. याबाबत माहिती देताना संजय कुंभार म्हणाले, बालवयाबरोबर या व्यवसायात वाढलेले अनेक तरूण कुंभार आळीत किल्ले, पणत्या, बोळकी तयार करतात. शहरातील व्यापारी कुंभारवाड्यातून माल खरेदी करून बाजारपेठा फुलवतात. दहा रुपये डझनापासून 81 रूपये डझनापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे बाजारात विक्रीला उपलब्ध झाले आहेत. काही दिवे साच्याने तर काही दिवे चाकावर केले जातात. हे दिवे करण्यासाठी शाडूच्या मातीबरोबरच बनारसहून खास माती मागवली जाते. बनारसहून येणाऱ्या मातीची किंमत दर गोणी मागे दोनशे रुपये आहे. मातीवर मजबूत आणि टिकाऊ दिवे बनतात. बनारसी मातीवर कोणताही आकार घडवता येतो, असे कारांगिरांनी सांगितले. दिल्ली, राजस्थान आणि गुजरातहूत आकर्षक मातीचे दिवे मागावण्यात आले आहेत. शहरातील व्यापारी तयार माल आणून शहरात विकत आहेत. थेट कुंभारवाड्यातूनही ग्राहक माल खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पुसेगाव व बुध येथील कारागिर पण त्यावर विशेष मेहनत घेत असतात. विविध प्रकारच्या दर्जदार व तुलनेत स्वस्त असणाऱ्या पणत्यांना दरवर्षीच मोठ्य प्रमाणावर मागणी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)