पढेगावात दरोड्याच्या तयारीतील 6 जणांना अटक

कोपरगाव – तालुक्‍यातील पढेगाव शिवारात दरोड्याच्या तयारीतील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
27 ऑगस्टला सकाळी सहाच्या सुमारास पढेगाव शिवारात काही जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात सापळा लावला. पढेगाव ते शिरसगाव रस्त्यावर 45 चारी चौफुली येथेहिरू गडोदा भोसले (वय 34), राहुल रोहम चव्हाण (वय 18), प्रदीप बापू चव्हाण (वय 19), आकाश प्रकाश भोसले (वय 20), भगिरथ बडोद भोसले, नामदेव बडोद भोसले(सर्व राहणार पढेगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयते, मिरची पुड, तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. साहाय्यक फौजदार रावसाहेब धिवर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी सहा जणांना न्यायालयात हजर केलेअसता त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक तुरनर पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)