पढेगावात तीन दुकाने, दोन घरेफोडली

श्रीरामपूर – तालुक्‍यातील पढेगाव येथेतीन दुकानेआणि दोन बंद घरेफोडून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लांबवण्यात आला. शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान ही चोरी झाली.

पढेगावात बाळासाहेब बनकर यांचेश्री स्वामी समर्थमेडिकल दुकान आहे. या दुकानातील 10 ते 15 हजार रुपये तसेच इतर वस्तूंची चोरी झाली. त्या शेजारील ढगे यांचे कापड दुकान फोडण्यात आले. तेथून किती माल चोरीस गेला हेनिश्‍चित समजू शकलेनाही. त्यानंतर नवलखा यांच्या किराणा दुकानाचेकुलुप तोडण्याचा प्रयत्न झाला. तोअयशस्वी झाल्यानंतर तेथून जवळच असलेल्या साहेबराव आहेर यांचे घर फोडण्यात आले. घरातील वस्तुंची उचकापाचक करण्यात आली. आहेर यांच्या घराजवळील विलास तुसे यांचे घर फोडून तेथूनही रोख रक्कम, दागिने तसेच इतर वस्तु चोरीस गेल्या. तुसे दोन दिवसांपूर्वी पुणे येथे गेल्याने घर बंद होते. चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून उचकापाचक केली. तुसे यांच्या घरातून दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि रोख रक्कम चोरीस गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)