“पडीक’ प्लॅस्टिकबाबत लवकरच निर्णय

पुणे – प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर जप्त केलेला प्लॅस्टिक माल पुनर्प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, तीन महिने उलटूनही जप्त माल अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पडून आहे. याची दखल घेत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ लवकरच सर्व स्थानिक संस्थामध्ये प्लॅस्टिक रिसायकलिंगबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. याद्वारे “पडीक’ प्लॅस्टिकबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यशासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लॅस्टिकविरोधी मोहिम हाती घेऊन राज्यभरात धडाक्‍यात कारवाई करण्यात आली. पुण्यातही अनेक ठिकाणी ही मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जप्त केले. महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या कारवाईदरम्यान जो प्लॅस्टिक माल जप्त करण्यात आला, तो पुनर्वापर प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आला आहे. मात्र, या कारवाईंना दोन ते तीन महिने उलटल्यानंतरही ते साहित्य या संस्थांच्या कार्यालयात तसाच पडून आहे. यामध्ये महापालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचा समावेश आहे.

याबाबत मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पडून असलेल्या प्लॅस्टिकबाबत मंडळाकडे सातत्याने तक्रार येत आहे. याची दखल घेऊन आम्ही लवकरच याबाबत पाहणी करणार आहे. या पाहणीनंतरच पडीक प्लॅस्टिकबाबतच्या पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)