पडाळे यांची बदली राजकीय दबावापोटी – कॉंग्रेस

पुणे – महापालिकेतील अतिक्रमण विभागातील मारहाण झालेले अधिकारी किशोर पडाळ यांची केलीली तडकाफडकी बदली ही राजकीय दबावापोटी केल्याचा आरोप महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसे पत्रही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

पडाळे यांना मारहाण झाल्याच्या विषयावर महापालिका मुख्यसभेत चर्चा झाली होती. एका विभागात तीन वर्षे काम केल्यानंतर बदली करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या राजकीय दबावापोटी पडाळ यांची हेतुपुरस्सर आधीच बदली करण्यात आल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्यास अथवा काही गैरप्रकार झाला असल्यास त्याचा खुलासा घेणे आवश्‍यक होते. मात्र त्याची थेट बदलीच करण्यात आली ही बाब दुर्दैवी आहे असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या सूडबुद्धीने केल्यास त्यांचे मनोधर्य खचेल आणि त्यातून चुकीचा संदेश जाईल. अधिकारी धाडसाने काम करायला पुढाकार घेणार नाहीत. याचा परिणाम विकासकामावर तसेच प्रशासकीय व्यवस्थेवर होईल, असेही शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे या प्रकारच्या कामकाजात आपण स्वत: लक्ष घालावे अशी विनंती शिंदे यांनी आयुक्तांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)