‘पडद्यामागची’ व्यस्तता (भाग-२)

खूप व्यग्र शिल्पा शेट्टी
व्यग्र असणे म्हणजे काय याची कल्पना शिल्पा शेट्टीकडे बघून येते. तिच्या लेखी तंदुरुस्ती फार महत्त्वाची आहे. 42 वर्षांच्या शिल्पा शेट्टीने आपली तंदुरुस्ती कायम ठेवली आहे. तिच्या तंदुरुस्ती संदर्भातील चार डीव्हीडी आत्तापर्यंत आल्या आहेत. एन्डॉर्समेंटबरोबरच टीव्ही शो देखील करणाऱ्या शिल्पाच्या व्यग्रतेचा परीघ खूप मोठा आहे. शिल्पाचा नवरा राज कुंद्रा मोठा व्यावसायिक असल्याने शिल्पा त्याला व्यवसायातही मदत करते. त्याशिवाय आयपीएलमध्ये तिचा एक संघ आहेच. शिल्पाच्या मते, या सर्वांमुळे चित्रपट आता लांब राहिले आहेत. मात्र चित्रपटांशी असलेले तिचे नाते संपलेले नाही. मी स्वतः निर्मिती संस्था सुरु केली आहे. “ढिशक्‍याऊ’ नंतर मी लवकरच पुढच्या चित्रपटाला सुरुवात करणार आहे.

करिष्माचा नियमित दिनक्रम
43 वर्षीय करिष्मा कपूर दोन मुलांची आई आहे. नुकताच तिने शाहरुख खान बरोबर आनंद एल राय दिग्दर्शित “झिरो’ चित्रपटात लहानशी भूमिका साकारली आहे. हल्ली ती एन्डोर्समेंटमध्ये अधिक व्यस्त असते. मात्र तीही चित्रपट करणे सोडले नसल्याचेच सांगते. अर्थात, तेच मुख्य ध्येय नाही, असे सांगायला ती विसरत नाही. ती म्हणते की माझी दोन्ही मुले आता मोठी झाली आहेत आणि त्यांना बऱ्याच गोष्टी कळू लागल्या आहेत. त्यामुळे आता मी मोकळेपणाने काम करु शकते. गेल्या काही दिवसांत मी चांगल्या जाहीरातीत काम केले आहे. आजही माझा दिनक्रम आरामशीर असा काही झालेला नाही. तसेच लोक मला विसरले नाहीत ही देखील चांगलीच गोष्ट म्हणायला हवी. प्रेक्षकाच्या आठवणीत मी राहिले आहे त्यामुळेच मला मनाप्रमाणे काम मिळतेय. त्यामुळे माझा वेळ कसा जातो हे कळत नाही. काही वेळा तर मला जुने दिवस आठवतात जेव्हा मी दोन शिफ्टमध्ये काम करत असे.

तंदुरुस्ती राखतेय बिपाशा
काहीच दिवसांपुर्वी बिप्सने आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. त्या प्रसंगी आपल्या नवऱ्याबरोबर ती आनंदी दिसत होतीच. वास्तविक केवळ तंदुरुस्तीच्या माध्यमातून बिपाशा बसू आपले खरे वय लपवू शकली आहे. त्यामुळेच तिला हेल्थ कॉन्शस म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात ती व्यग्र आहे. काही दिवसांपुर्वीच तंदुरुस्तीबाबतचा तिचा नवा व्हिडिओ आला आहे. बिपाशा सांगते की तंदुरुस्तीसाठी माझा खूप जास्त वेळ जातो.

अनेक फिटनेस कार्यशाळेत मी सहभागी होते. त्यामुळेच कदाचित चित्रपट माझ्या प्राधान्यक्रमावर नाहीत. त्याशिवाय बऱ्याच एन्डोर्समेंट असतात. 2015 मध्ये आलेल्या अलोन या चित्रपटानंतर मी कोणताही नवा चित्रपट केलेला नाही. अर्थात मला त्याचे दुःख नाही. कारण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. वय वाढले आहे. ते वाढले असताना जर कोणी आपल्याला वयापेक्षा लहान दिसत असल्याचे सांगितले की मनालाही बरे वाटते. अर्थात सुडौल शरीर कायम ठेवणे खूप सोपेही नाही.

रवीना टंडन
चित्रपट असो किंवा टीव्ही शो रवीना टंडन ते काम करताना दिसते. तिचे वय 40 वर्षांहून अधिक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत ती ही सर्व कामे करते. तिला चार मुले आहेत. त्यापैकी दोन दत्तक घेतली आहेत. लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाही असे काही तिने ठरवले नव्हते. मात्र आपण आता चित्रपटांच्या मागे धावायचे नाही अशी मनात खूणगाठ बांधली. त्यामुळेच की काय चित्रपटांबाबत मला घरी ऑफर्स येतात. त्याचा फायदा असा झाला की ती टीव्हीवर झळकू लागली. आपल्या खाजगी आयुष्यातील व्यग्रता कायम ठेवत काम कऱणे मला पसंत आहे.

महिमा चौधरी
44 वर्षीय महिमा चौधरीने 2013 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर तिने स्वतःला व्यग्र ठेवले आहे. अर्थात ती स्वतःच्या पसंतीला अधिक महत्त्व देत नाही. तिच्या मते, ती स्वतःच्या आवडीचे काम करते आहे आणि तिला दरवर्षी कमीत कमी एका तरी चित्रपटात काम करता येते. त्यापेक्षा अधिक धावपळ करण्याची तिची इच्छाही नाही. त्याशिवाय एन्डोर्समेंटचेही भरपूर काम मिळते.

या सर्व तारकांबरोबरच रेखा, हेमामालिनी, श्रीदेवी या अभिनेत्रींनीही केवळ चित्रपटातील भुमिकांवर भिस्त ठेवली नाही. रेखा सतत काही ना काही कारणाने प्रकाशझोतात राहते. हेमामालिनी किती व्यग्र असते याबाबत विशेष सांगण्याची गरज नाही. श्रीदेवी मात्र नव्याने व्यग्र होते आहे. काही जाहिरातींमध्ये तिने काम केले आहे. चित्रपटातही ती स्वतःच्या पद्धतीनेच दिसते. या सर्व तारका चित्रपटांपासून दूर असूनही व्यग्र राहातात ही नक्कीच चांगली गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)