पडदे देतील थंडावा…

एप्रिलचा पहिला आठवडा आला की थोडसं दमट वातावरण तयार होऊ लागतं. यंदा तर उन्हाळ्याची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक गोष्टी अवलंबतो; परंतु ज्या ठिकाणी राहतो ते घर थंड ठेवण्यासाठी मात्र आपण विशेष उपाययोजना करण्याचे विसरतो. म्हणूनच “टिप्स्‌ फॉर कुल होम’ या सदराच्या माध्यमातून आम्ही तुमचे घर थंड ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत.

“आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा’ हे वाक्‍य दरवर्षीच आपण ऐकतो किंवा वाचतो आणि त्यादृष्टीने खबरदारीही घेतो. उन्हाळा सुरू होतो न होतो तोच आपण टोपी, गॉगल, रुमाल आदींच्या तयारीनिशी घराबाहेर पडतो. प्रवासात उन्हाचा तडाखा बसल्यावर ताक, सरबत किंवा तत्सम थंडगार पेयही घेतो; परंतु ज्या घरात आपण
दिवसाचा सर्वात जास्त काळ घालवत असतो त्या घराला थंड ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेत नाही. याचउलट आपण घरातील वातावरण कुल ठेवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या तर त्याचा घरातील सर्वांनाच फायदा होऊ शकतो.

पडद्यांचे पर्याय
घरातील खिडक्‍यांना लावलेले पडदे हे सजावटीमध्ये मोलाची भूमिका बजावत असतात; परंतु उन्ह्याळ्यात हेच पडदे घरात गारवा निर्माण करण्याची आणखी एक जबाबदारी पार पाडू शकतात. घराच्या खिडक्‍यांसाठी हलक्‍या रंगाचे व डोळ्यांना सुखद वाटतील अशा रंगांचे पडदे वापरले तर त्यातून हवा खेळती राहू शकते. शक्‍यतो कॉटनचे पडदे वापरात येतील. गडद काळे रंग वापरू नये, कारण त्यातून उष्णता अधिक वाढते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरी स्लायडिंगच्या खिडक्‍या जर अॅन्टी रिफ्लेक्‍टेड नसतील तर त्याला उष्णता परावर्तित करणाऱ्या फिल्म्स्‌ लावा. त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन घराचं तापमान काही अंशी कमी होण्यास मदत होते. तसंच आजकाल बाजारात विविध रंगांचे, प्रकारचे ब्लाइंड्‌स असलेले पडदे उपलब्ध आहेत. हे सरकते पडदेही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे घराला एक प्रकारचा आकर्षक लूकही मिळतो. वाळ्याच्या पडद्याच्या पर्यायाचाही विचार तुम्ही करू शकता. वाळ्याचे किंवा चटईचे पडदे एक तर पर्यावरणपूरक असतात, दुसरं म्हणजे वाळ्याच्या पडद्यावर पाण्याचा शिडकावा केल्याने त्यातून प्रवाहित होणारा वाराही सुगंधित होऊन घरात दरवळतो.

आज बाजारात पडद्यांचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. यातील आपल्या दृष्टीस योग्य वाटेल तो रंग आणि पर्याय निवडा व शक्‍य तितक्‍या लवकर घरामध्ये पडद्यांचा बदल करा. जेणेकरून उन्हाळ्याच्या मुख्य तडाख्यापासून तुमच्या कुटुंबीयांचे संरक्षण होईल आणि घरात थंडावा निर्माण झाल्याचा आनंदही तुम्हाला घेता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)