पडत्या बाजारातील दोन सूत्र (भाग-१)

बाजारातील पडझड ही नव्याने गुंतवणूक करण्याची संधी आहे, असे जो मानतो, तो खरा गुंतवणूकदार. पण अशावेळी कोणते शेअर घ्यायचे आणि कोणत्या पातळीवर घ्यायचे, याला अतिशय महत्व आहे. असे काही शेअर्स आपण पाहणार आहोत.

मागील आठवड्यात आपला बाजार सात महिन्यातील नीचांकी पातळीवर बंद झालाय. निफ्टी ५० ही १००४२ वर तर सेन्सेक्स ३३३४९.३१ ला बंद झालाय. २३ मार्च २०१८ रोजी निफ्टी५० ही चार आकड्यांत (९९९८.०५) बंद झाली होती. त्यानंतरचा न्यूनतम बंद भाव हा मागील आठवड्याचा बंद भाव होता.

पडत्या बाजारातील दोन सूत्र (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजार सर्वोच्च पातळीवर असताना चौकाचौकात आपणांस बरेच जण बाजाराबद्दल तावातावानं बोलताना आढळतात. परंतु बाजारानं आपटी खाल्यावर हेच लोक धास्तावलेले दिसतात. सध्या भले-भले इन्व्हेस्टर्स सुद्धा हवालदील दिसत आहेत. आता राकेश झुनझुनवालाजींचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांच्या पोर्टफोलिओतील दिवाण हौसिंग फायनान्सचा शेअर मागील महिन्यापासून जवळजवळ ७५% पडलाय (रु.६९१ ते रु.१७६). परंतु त्यांनी या कंपनीतील आपला हिस्सा न विकता उलट ०.३९% नी वाढवलाय. अशा या गुंतवणूकदारानं अजूनही काही कंपन्यात त्यांच्या पडत्या भावात शेअर्स खरेदी करून आपला हिस्सा वाढवण्यास सुरुवात केली आहे. उदा. टीव्ही १८ (६२.५ लाख शेअर्स), ज्युबिलंट लाईफ (०.३%), एस्कॉर्टस (४२३६८ शेअर्स), फोर्टिस हेल्थकेअर (१% वरून २.४% हिस्सा). तर मग अशा बाजारात सर्वसामान्यांनी कसा फायदा करून घ्यायचा हाच आपला पुढील दोन लेखांचा विषय आहे.

अशा परिस्थितीत सर्व गुंतवणूकदारांचा पहिला प्रश्न असतो, अजून बाजार पडेल का? याचं उत्तर ‘होय’ असेल तर कपाळावर आठी न पाडता ही येणाऱ्या दशकातील एक चांगली संधी असू शकते असा विचार करणारा तो खरा बाजारातील गुंतवणूकदार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)