पडत्या बाजारातील दोन सूत्र (भाग-२)

बाजारातील पडझड ही नव्याने गुंतवणूक करण्याची संधी आहे, असे जो मानतो, तो खरा गुंतवणूकदार. पण अशावेळी कोणते शेअर घ्यायचे आणि कोणत्या पातळीवर घ्यायचे, याला अतिशय महत्व आहे. असे काही शेअर्स आपण पाहणार आहोत.

पडत्या बाजारातील दोन सूत्र (भाग-१)

भारतातील प्रसिद्ध गुंतवणूक गुरु रामदेव अगरवाल म्हणतात, “Buy Right and Sit Tight”. खरोखर, जर तुमचा तुमच्या कंपनीवर, तिच्या मॅनेजमेंटवर, कंपनीच्या व्यापार पद्धतीवर भरवसा असेल तर अशा वेळेस बाजारातील पडझड ही एक संधी बनून आपल्याकडं येत आहे हे लक्षात ठेवा. मागील आठवड्यात माझ्याकडील बहुतांशी गुंतवणूकदारांनी बाजारात अजून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि खरंच ही बाब उल्लेखनीय आहे. बाजारात फक्त योग्य वेळ साधण्याऐवजी पडत्या बाजारातून चांगल्या कंपनीचे शेअर्स रास्त भावात खरेदी करणं हाच आपला प्रमुख उद्देश असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर अशा पडत्या बाजारात दोनच सूत्रं कामी येतात, १) असलेले शेअर्स विकून टाकून पुन्हा त्यांचा भाव पडल्यावर ते खरेदी करणं किंवा वेळीच कल बदल ओळखून बाजारात मंदी करणं आणि २) पडत्या बाजारात उत्तम कंपन्यांचे शेअर्स निवडून ते योग्य भावात खरेदी करून भाव वर जायची वाट पाहणे. पैकी पहिला पर्याय फार कमी लोकांना आत्मसात होतो. राहिला दुसरा पर्याय वजा सूत्र. आता उत्तम कंपन्या निवडायच्या कश्या यावर कितीही चर्चा केली तरी ती कमीच आहे. तर पुढील दोन लेखांत मी माझ्या परीनं काही चांगल्या कंपन्या सुचवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. दिवाळीच्या तोंडावर डिस्काउंट सेलमध्ये अशा प्रकारे उत्तम खरेदी करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. तर, शुभस्य शीघ्रम !

या लेखात सर्वात प्रचलित लार्ज कॅप्स निफ्टी ५० मधील ब्लू-चिप समजल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांसाठी टप्प्या-टप्प्यांमध्ये खरेदीस तांत्रिकदृष्ट्या साजेशा पातळ्या सुचवत आहे. तक्त्यात दिलेल्या पातळ्या ह्या सध्याचा भावात खरेदी केल्यानंतर पुनर्खरेदीसाठी सुचवलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)