पठाणकोट हायवेवर चार संशयित ताब्यात : घातली होती पोलिसांची वर्दी 

पठाणकोट – पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे चौघेही जण हिमाचल प्रदेशची नंबर प्लेट असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये प्रवास करत होते. नाकेबंदीदरम्यान पोलीस तपास करताना त्यांना अटक करण्यात आली. चौघांनीही पोलिसांची वर्दी घातली होती. या चारही संशयितांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

अमृतसरमधील एका गावात ग्रेनेड हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याआधीही १४ नोव्हेंबर रोजी चार संशयितांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये पठाणकोटच्या लष्कराच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ७ जवान शहीद  झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)