पठाणकोट-अमृतसर हल्ले म्हणजे निव्वल भ्याडपणा – कॅप्टन अमरिंदर सिंह 

गुरुदासपूर (पंजाब) – पठाणकोट-अमृतसरचे हल्ले म्हणजे निव्वळ भ्याडपणा. शस्त्रसंधीचा भंग करण्यास कोणते लष्कर शिकवते? दुसऱ्या बाजूच्या सैनिकांची हत्या करण्यास कोणते लष्कर शिकवते? अशी प्रश्‍नांची सरबत्ती करत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिदर सिंह यांनी पाकिस्तानवर प्रखर टीका केली. करतारपूर कॉरिडॉर पायाभरणी समारंभानंतर ते बोलत होते.

भारत-पाक सीमेजवळील मान या गावी हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू उपस्थित होते. स्वत: एक लष्करी अधिकारी असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पाकिस्तानच्या काळ्या कर्तृत्वाचे पाढेच वाचले. एका गावात चाललेल्या धर्मसभेवर ग्रेनेड फेकण्यात आल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, मी ही लष्करात होतो. जनरल बाजवा हे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत.

आम्हाला लष्करात देशाचे रक्षण करायला शिकवले होते. एक लष्करातील जवान म्हणून मी जनरल बाजवांना विचारतो, शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास, दुसऱ्या बाजूच्या जवानांची हत्या करण्यास, दहशतवादाला आश्रय देण्यास कोणते लष्कर शिकवते? आमच्याकडेही लष्कर आहे. मोठे, सज्ज आणि बलाढ्य लष्कर आहे, पण आम्ही शांतीवर विश्‍वास ठेवतो. अमृतसरच्या निरंकारी भवनावर झालेल्या हल्ल्यातील ग्रेनेड मेड इन पाकिस्तान होता. याचा त्यांनी उल्लेख केला.

करतारपूर कॉरिडारबद्दल त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले. त्यांचे निमंत्रण नाकारण्याबाबत ते म्हणाले, जोपर्यंत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत मी पाकिस्तानला जाणार नाही. पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना बजावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)