पठाणकोटमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्याने हायअलर्ट जारी

नवी दिल्ली : पंजाबमधील पठाणकोट एअरबेसजवळ स्थानिक नागरिकांनी दोन संशयितांना पाहिल्याचा दावा केल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरात पंजाब पोलीस आणि लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मस्कीन अली नावाच्या एका व्यक्तीकडे दोन व्यक्तींनी लिफ्ट मागितली. लिफ्ट मागणारे दोघं लष्काराच्या गणवेशात होते. सैन्यातील समजून मस्कीन अली याने त्यांना लिफ्ट दिली. त्यानंतर त्या दोघांनी अलीवर हल्ला केला आणि कार घेऊन पळ काढला. मस्कीन यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. कार घेऊन पळालेल्या दोघा संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.

-Ads-

दरम्यान, जुलै २०१५ आणि जानेवारी २०१७ मध्ये गुरुदासपूरमध्ये दीनानगर आणि पठाणकोटच्या लष्कराच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)