पठाणकोटमध्ये दहशतवादी शिरल्याचा संशय

चंदीगड – पठाणकोट परिसरात दोन संशयीत अतिरेकी घुसले असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिल्यानंतर पठाणकोट आणि पंजाब मध्ये दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक नागरीकांनी सांगितले की काल रात्री आम्हाला दोन अज्ञात इसमांनी लिफ्ट मागितली. ते नंतर कठुआच्या दिशेने गेले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधीतांचा शोध जारी केला असून सर्व भागात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. या इसमांजवळ शस्त्रे होती असा दावाही काही स्थानिकांनी केला आहे. त्यानुसार हे दहशतवादी असावेत असे समजून आम्ही शोध मोहीम सुरू केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणानंतर पठाणकोट शहरातील सर्व रस्त्यावर वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी गुरूदासपुर आणि पठाणकोट जिल्ह्यात नऊ बुलेट प्रुफ ट्रॅक्‍टर्स तैनात केले आहेत. पठाणकोटाला जुलै 2015 आणि जानेवारी 2016 या अवधीत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)