पक्ष सोडण्याबाबत भाष्य केलेच नाही ; डॉ. सुजय विखे पाटील यांचे घूमजाव

कॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत भाष्य केलेले नाही वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला

संगमनेर: दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच उमेदवारी करण्याचा माझा निर्णय आहे. पण जागा वाटपात कॉंग्रेसला ही जागा मिळाली नाही, तर वेगळा राजकीय निर्णय घेण्याचे सूतोवाच करताना, मी अन्य पक्षात जाण्याबाबत आणि कॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. असा खुलासा डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिबलापूर येथे निळवंडे कालव्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा माझा निर्धार कायम आहे. कॉंग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल, असा माझा विश्‍वास आहे. पण जागा वाटपात किंवा कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला हा मतदारसंघ न आल्यास मी काही वेगळा राजकीय निर्णय घेतल्यास तो माझा वैयक्तिक निर्णय असेल, असे मी बोललो. याचा अर्थ मी कॉंग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार, असा होत नाही, याकडे लक्ष वेधून डॉ. विखे पाटील म्हणाले, माझ्या वक्‍तव्याचा पत्रकारांनी वेगवेगळ्या अर्थाने अंदाज लावला, यापूर्वी या जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुका या कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच लढविल्या आहेत.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचेच काम एक कार्यकर्ता या नात्याने पुढे घेऊन मी जात आहे. सरकारच्या धोरणांविरोधात विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी मागील साडेचार वर्षांत घेतलेली आक्रमक भूमिका, शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे मांडलेले प्रश्‍न पाहाता, माझ्या वक्‍तव्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला काळिमा लागू नये, एवढी काळजी घेण्याची गरज होती, अशी अपेक्षा डॉ. विखे पाटील यांनी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)