पक्ष जबाबदारी देईल ती पेलण्याची तयारी : रोहित पवार

अकोले: पक्ष जबाबदारी देईल, ती पेलण्यास तयार आहे. असे सुचक वक्‍तव्य करून आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात उमेदवारी करण्याची अप्रत्यक्ष कबुलीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू बारामती ग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडियन मिल्स शुगरचे अध्यक्ष, व्ही एस. आय. नियामक मंडळाचे सदस्य रोहित पवार यांनी दिली.

तालुक्‍यातील कळस बु.येथे युवा संवाद कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जबाबदार नेतेमंडळी ठिकठिकाणी फिरत आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपणही यामध्ये उडी घेतली आहे.कर्जत, जामखेड या तालुक्‍यात ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या चोंडी येथील शाळेला ई-लर्निगचे दोन संच भेट देण्यासाठी परवा गेलो होतो. तेव्हा त्या भागात फिरत असतांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते या व अन्य समस्यांची माहिती लोकांकडून मिळाली. आणि त्यातून पालकमंत्री नापास झाल्याचे मी विधान केले. याचा वेगळा अर्थ काढू नये. फक्त तेथील प्रश्‍नांवर प्रकाश झोत टाकणे हा हेतू होता.एकाच योजनेचे दोनदा भूमिपूजन व त्यावर प्रत्येक वेळी 3.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही बाबच पालकमंत्री व मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांचा “रिझल्ट’ जाहीर झाला आहे असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझे आजोबा शरद पवार, त्यापूर्वी पंजोबा गोविंदराव पवार, पणजी शारदाबाई पवार यांनी आमच्यासाठी “पवार’ नावाचा एक “विश्‍वास’ जनतेमध्ये पेरलेला आहे. त्यामुळे आमच्याकडून काही चुकीचे घडू नये. यासाठी आमचे प्रयत्न असतात, अशी भूमिका व्यक्‍त करतांना सोशल मिडियावर जातीधर्मांचे विष पेरण्याचे काम सत्तारुढ करत आहेत. व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरुर आहे. परंतू त्या स्वातंत्र्याचे गांभीर्य सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. बारामतीत येवून पवार यांना राजकीय आव्हान देणारे केवळ प्रसिध्दी हव्यास्यापोटी आव्हानबाजी करतात. परंतू “अच्छे दिन’ आणण्याची भाषा करणारे किंवा सी.बी.आय च्या दबावाखाली काम करणारे अधिकारी हे सर्वच आमचे सहानुभुतीदार बनले आहेत. आणि आमची क्षमता सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या आव्हान देणाऱ्या प्रवृत्तीची आम्ही नव्हे, तर जनता दखल घेते, असा त्यांनी युक्तिवाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)