पक्ष्यांसाठी पाणी आणि चारा

पाटसमधील नागेश्‍वर विद्यालयात उपक्रम

वरवंड- दौंड तालुक्‍यातील वरवंड येथे सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटस परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडू लागले आहेत. पाण्यासाठी पक्ष्यांना आणि मुक्‍या प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. सामाजिक बांधीलकीतून पाटस येथील नागेश्‍वर विद्यालयात विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांना चारा आणि पाणी देऊन उपक्रम राबविला. हा उपक्रम घरी, शेती परिसरात राबविण्याचे आवाहन पाटस येथील पत्रकारांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अमर परदेशी, सचिन आव्हाड, राजेंद्र झेंडे, अक्षय देवडे, संजय सोनवणे, सुशांत जगताप, अमोल होले यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य आबासाहेब खरतोडे, उत्तम रुपनवर, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांलगत टाकाऊ प्लॅस्टिकच्या अर्ध्या कापलेल्या बाटल्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी ठेवण्यात आले. नागेश्‍वर विद्यालयातील परिसरात झाडांलगत पक्ष्यांसाठी छोट्या कुंड्यामध्ये पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)