पक्ष्यांच्या फोटोसाठी “कॉल प्ले बॅक’चे जाळे!

 हौशी मंडळींचा हव्यास उठतोय पक्ष्यांच्या आरोग्यावर


“हार्मोनल इम्बॅलन्स’मुळे प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम

– गायत्री वाजपेयी

पुणे – विविध अभयारण्य, जंगल परिसर अथवा पाणवठ्यांच्या ठिकाणी पक्षी बघण्याची, त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची हौस अनेक हौशी नागरिकांना असते. मात्र यासाठी “कॉल-प्ले बॅक’ हा एक भयानक प्रकार वापरला जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून त्यांना बोलावले जाते आणि त्यानंतर त्यांचा फोटो काढला जातो. परंतु या प्रकारामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याचे नोंद पक्षीनिरीक्षकांनी नोंदविली आहे.

“कॉल-प्ले बॅक’ ही पक्ष्यांसंदर्भातील संशोधनात वापरली जाणारी शास्त्रीय पद्धत आहे. यानुसार पक्ष्यांच्या मिलन काळातील संकेतांचे रेकॉर्डिंग केले जाते आणि त्यावरून त्यांच्या वागण्यातील बदलांचा अभ्यास केला जातो. परंतु, गेल्या काही काळात पक्ष्यांचे छायाचित्रण करणारे छायाचित्रकार या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. विशेषत: पक्षी अभयारण्याच्या परिसरात हा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतो. इंटरनेटवर हे आवाज सहजपणे उपलब्ध असल्याने या पक्षी निरीक्षकांकडून त्यांचा केला जात आहे.

याबाबत पक्षी निरीक्षक धर्मराज पाटील म्हणाले,”कॉल प्ले बॅक’ ही सहसा संशोधनासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. मात्र, अलिकडे हौशी पर्यटक या पद्धतीचा वापर करून पक्ष्यांचे फोटो काढतात. मात्र, सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. वास्तविक प्रत्येक पक्षाचा मिलनाचा कालावधी हा वेगवेगळा आणि मर्यादित स्वरूपाचा असतो. परंतु अवेळी आणि वारंवार दिल्या जाणाऱ्या या रेकोर्डेड “कॉल’मुळे पक्षांमध्ये “हार्मोनल इम्बॅलन्स’ निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होत आहे. हे प्रकार वेळीच थांबविले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील.’

मुख्यत्वे पक्षी अभयारण्यात हे प्रकार जास्त घडताहेत. या ठिकाणी दिवसभरात शेकडोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. अशावेळी कॉल-प्ले-बॅक’च्या वारंवार होणाऱ्या वापरामुळे या परिसरातील पक्ष्यांना नेहमीच व्यत्यय येतात. अभयारण्यातील व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या वनविभागाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन, त्याबाबतीत उपाययोजना कराव्यात, असेही पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)