पक्षाने माझ्यावर कारवाई करून दाखवावी-शत्रुघ्न सिन्हा यांचे भाजपला आव्हान

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हादेखील भाजप लवकरच सोडतील, अशा बातम्या येत होत्या. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर त्यांनी आपल्या पक्षालाच आव्हान दिले असून पक्षाने माझ्यावर कारवाई करुन दाखवावी असे म्हटले आहे.

पाटणामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित राष्ट्रमंच अधिवेशनात सिन्हा बोलत होते. ”माझ्यावर कारवाई करण्याचा गेल्या बिहार विधानसभा निवडणुकांपासून पक्षाचा विचार सुरू आहे. पण त्यांची परिस्थिती इतकी दयनिय झाली आहे की, यासाठी त्यांना मुहूर्त पाहावा लागत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्याच पक्षावर टीका केली. तसेच ”त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते मला पक्षातून काढण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण न्यूटनचा तिसरा नियम लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया ही उमटतच असते” असा इशाराही सिन्हा यांनी पक्षाला दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)