पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपाच्या नेत्याला कोसळले रडू

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा आणि यादी जाहीर होण्याबरोबरच नाराजीचे सत्रही सुरू झाले आहे. इच्छुकांबरोबर त्यांच्या समर्थकांच्या नाराजीला काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सामोरे जावे लागत आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथे उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाचे नेते शशील नामोशी यांनी माध्यमासमोरच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

कलबुर्गीमधून उमेदवारी मिळेल या आशेवर भाजपा नेते शशील नामोशी होते. पण जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा नामोशींना मोठा धक्का बसला. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नामोशींचे नाव वगळण्यात आले.

दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्याचा धक्का नामोशींना सहन झाला नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार परिषदेसाठी बोलावले. आपलं म्हणणं माध्यमासमोर मांडत असताना नामोशींच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)