पक्षाचा वृक्ष वाढवून वटवृक्ष करणारे आज उन्हात बसले आहेत – एकनाथ खडसे

जळगाव- पक्षाचा वृक्ष वाढवून वटवृक्ष करणारे आज बाहेर उन्हात बसले आहेत, या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोनशिला समारंभास आलेल्या खडसेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आपल्यावरच्या आरोपांवर सरकारला पुरावे मिळाले का, याचे उत्तर सरकारने जाहीरपणे जनतेला द्यायला हवे, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच ज्यांच्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तोच आज बाहेर आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)