पक्षमुक्‍तीपेक्षा भीती आणि द्वेषमुक्‍त देश असावा

फादर फ्रान्सिस दिब्रिटो : साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्‌घाटन

पुणे – “प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो. मात्र, आपल्या धर्मग्रंथाबरोबर संविधान देखील पूजनीय असले पाहिजे. या संविधानानेच सगळ्यांना मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चार सूत्रांच्या माध्यमातून परिपक्व झालेली राज्यघटना जोपर्यंत राज्यात लागू आहे, तोपर्यंत देशात कोणालाही भयभयीत होण्याचे कारण नाही. कोणताही देश पक्षमुक्त करण्यापेक्षा भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त करणे जास्त गरजेचे आहे,’ असे मत साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्‌घाटन रविवारी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिब्रिटो बोलत होते. अ.भा.मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, शिल्पकार सुनील देवरे, संयोजक दिलीप बराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिब्रिटो म्हणाले, “जोपर्यंत संविधान पद्धती भारतात आहे, तोपर्यंत भारत हा सर्वधर्मसमभाव टिकून राहील. गेल्या काही काळात देशात साहित्यिक विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे. त्यामुळेच साहित्यिकांनी कोणा एका व्यक्तीच्या पायाशी स्वाभिमान, अस्तित्व आणि विवेक गहाण न ठेवता, वेळोवेळी भूमिका घेऊन आवाज उठवत, “राजा तू चूकत आहेस’ हे ठणकावून सांगितले पाहिजे.

साहित्य क्षेत्रासाठी चांगले समीक्षक निर्माण होणे गरजेचे आहे. संमेलनातून कोणते साहित्य निर्माण होते याचा विचार झाला पाहिजे. साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, असे म्हणताना बाकीचे गौण आणि दुय्यम आहेत का असा प्रश्‍न उपस्थित होतो, असे गज्वी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)