पक्षकारांचे आंदोलन खंडपीठासाठी सकारात्मक बाब

40 वर्षांपासून रखडला प्रस्ताव
पुणे आणि औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू करण्याचा प्रस्ताव 1978 मध्ये विधिमंडळाने मंजूर केला आहे. त्यानुसार 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरूही झाले. मात्र, प्रस्तावाला 40 वर्षे झाली. तरी अजून येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. वकील, त्यांच्या संघटना खंडपीठासाठी वेळोवेळी प्रयत्न करत आल्या आहेत. आंदोलने करत आहेत. 2016 मध्ये तर तब्बल 16 दिवस काम बंद आंदोलन केले होते. तरीही वकिलांची फसवणूक होत आहे. केवळ खंडपीठ सुरू करण्याची राजकीय आश्‍वासने मिळत आहेत.

वर्षानुवर्षे प्रश्‍न सुटण्याची अपेक्षा : सामान्य नागरिकांचाही सहभाग

पुणे- खंडपीठासाठी आता पक्षकार रस्त्यावर उतरू लागले आहेत. 31 जानेवारी रोजी पक्षकारांच्या दोन संघटनांनी तर या मागणीसाठी शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ लाक्षणिक आंदोलन केले होते. वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशननेही या आंदोलनास पाठिंबा दिला. तरीही पक्षकारांनी आंदोलन करणे, ही साधी गोष्ट नाही. पुणेकर या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. पक्षकार, नागरिक खंडपीठासाठी मैदानात उतल्यास खंडपीठ होण्यास विलंभ लागणार नाही. लोक सहभागी झाल्यास आपोआप राज्यकर्त्यांचा पाठिंबा मिळेल. वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्‍न सुटेल. त्यासाठी पक्षकार, नागरिकांना हे आंदोलन सुरू ठेवावे लागणार आहे.

खंडपीठासाठी आंदोलने, त्यानंतर राजकीय आश्‍वासने ही आता नित्याचीच झाली आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी, येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. खंडपीठ सुरू होण्यासाठी वकील तर वर्षानुवर्षे आंदोलन करत आहेत. पुणेकरांनी रस्त्यावर उतरून आवाज उठविण्याची गरज आहे. याची जाणीव पुणेकरांना झाली आहे. मात्र, पुणेकर केवळ चर्चा करतात. आंदोलन अथवा प्रत्यक्ष कृती नाही, अशी राजकीय भावना आहे. मात्र, यास छेद देण्यात आला आहे. 31 जानेवारी रोजी पुणे नवनिर्माण सेना आणि पक्षकार संघ या दोन संघटना रस्त्यावर उतरल्या. त्या दोन संघटनांनी आंदोलन केले. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आज दोन संघटनानी आंदोलन केले. उद्या आणखी संघटना, पर्यायाने पुणेकर रस्त्यावर उतरली. खंडपीठाबाबत चालढकल करणाऱ्यांची पळता भुई केल्याशिवाय सोडणार नाहीत. जनमतापुढे झुकत सरकारला येथे खंडपीठ स्थापन करून द्यावेच लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)