पकिस्तानचे तालिबानला शांतिवार्तेत सहभागाचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील शांतिवार्तेत सहभागी होण्याचे तालिबानला आवाहन केले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी अलीकडेच तालिबानला हिंसाचार सोडून शांतिवार्तेत भाग घेण्यासाठी आवाहन केले आहे. त्या संदर्भात पाकिस्तान मदतीसाठी पुढे आले आहे.

राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानला एक राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याची तयारी दाखवली आहे. त्याचबरोबर काबूलमध्ये एक कार्यलय सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची आणि संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी ब्लॅकलिस्टमधून तालिबानी नेत्यांची नावे वगऴण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ऑफर दिली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे. आणि सार्वजनिक निवेदनांद्वारे तसेच वैयक्तिक संदेशांद्वारे शांतिवार्तेत सहभागी होण्यासासाठी निमंत्रण दिले आहे.

सार्वजनिक निवेदने आणि स्वतंत्र संदेशांद्वारे तालिबानींना शांतता प्रक्रियेत सहभागी होण्याचा संदेश पाकिस्तान तालिबानला देत असून ही एक सामायिक जबाबदारी असल्याचे पाकिस्तानच्या परराष्टृ मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैजलज यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अफगणिस्तानच्या शांतिप्रयत्नांचे पाकिस्तानने स्वागत केले असून त्याला आपले समर्थन असल्याचे सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)